वृत्त क्र. 256
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी
9 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या नियुक्त्या
नांदेड, दि. 20 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये जिल्ह्यातील 9 मतदारसंघात निवडणूक कामासाठी 9 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून केल्या आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातील (83-किनवट, 84-हदगाव विधानसभा मतदार संघ) व 16-नांदेड लोकसभा मतदार संघातील (85- भोकर, 86-नांदेड उत्तर, 97-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91- मुखेड विधानसभा मतदार संघ) तसेच 41-लातूर लोकसभा मतदार संघातील 88-लोहा विधानसभा मतदार संघ असे एकूण 9 विधानसभा मतदार संघामध्ये, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी, 09 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियूक्ती झाली असून त्यापैकी 08 सहाय्यक निवडणूक अधिकारी हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पदी कार्यरत असल्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदसिध्द आहेत. उर्वरित (01) 86- नांदेड उत्तर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभाग नांदेड ललितकुमार एस. वऱ्हाडे यांना तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी 09 विधानसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या सर्व स्थायी निगराणी पथक आणि फिरते पथक यांचे प्रमुखांना विधानसभा कार्यक्षेत्र हद्दीपावेतो 16 मार्च ते 6 जून 2024 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment