Thursday, September 14, 2023

लेंडी प्रकल्पांतर्गत चार बुडीत गावातील 1 हजार 44 लाभार्थ्यांना 38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये वितरीत - सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

 लेंडी प्रकल्पांतर्गत चार बुडीत गावातील 1 हजार 44 लाभार्थ्यांना

38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये वितरीत

-  सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

 

§  उर्वरित गावांना अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु

नांदेड (जिमाका) दि. 14 :-लेंडी प्रकल्पांतर्गत बुडीत गावातील वाढीव कुटूंबास प्रति कुटूंब 3 लाख 69 हजार रुपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. मंजूर अनुदान उपविभागीय अधिकारी कार्यालय, देगलूर यांचे स्तरावरुन वितरीत करण्यात येत आहे. लेंडी प्रकल्पांतर्गत मुखेड तालुक्यातील मौ. रावणगाव, मौ. भाटापुर, मौ. हसनाळ, मौ. मारजवाडी या चार गावांच्या एकूण 1 हजार 44 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 लक्ष 69 हजार याप्रमाणे एकूण 38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.

या प्रकल्पात मुखेड तालुक्यातील मौ. रावणगाव, भाटापुर, हसनाळ, भेंडेगाव, इटग्याळ प.मु., वळंकी, कोळनुर, भिंगोली, मारजवाडी, भासवाडी, मुक्रमाबाद या गावाचा समावेश आहे.  मुखेड तालुक्यातील मौ. रावणगाव येथील 519 लाभार्थ्यांना एकूण 19 कोटी 15 लाख 11 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. भाटापुर येथील 42 लाभार्थ्यांना एकूण 15 कोटी 49 लाख 8 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. हसनाळ येथील 255 लाभार्थ्यांना एकूण 9 कोटी 4 लाख 5 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. मारजवाडी येथील 228 लाभार्थ्यांना एकूण 8 कोटी 41 लाख 32 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित गावांचे अनुदान वितरीत करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...