नांदेड,
दि. 3 :- कृषि विभाग व कृषि पीक विमा कंपनी यांच्या संयुक्त
विद्यमाने नांदेड तालुका कृषि अधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजना
शेतकरी सुविधा कक्ष उघडण्यात आला आहे.
नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा
भरताना येणारी अडचण दूर व्हावी. त्यांना मार्गदर्शन व्हावे व माहिती भरताना मदत
होण्यासाठी नांदेड तालुक्यातील “प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी सुविधा
कक्षाची” स्थापना करण्यात
आली. या सुविधा केंद्राचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
यांचे हस्ते आज करण्यात आले.
यावेळी नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी.
सुखदेव, तालुका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे, मंडळ कृषि अधिकारी सतीश सावंत,
प्रकाश पाटील, कृषि अधिकारी पुनम चालरमल, कृषि पर्यवेक्षक शिवाजी बारसे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.
चलवदे यांनी शेतकऱ्यांना पीक विमाचा भरणा करुन संभाव्य जोखमीपासून संरक्षण घ्यावे
व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
पीक विमा शेतकरी सुविधा केंद्राची स्थापन कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी कृषि सहायक वसंत जारीकोटे, शंकर पवार, मनोहर वडवळे, रामदास कमठेवाड,
श्रीमती एस. डी. देशमुख, सहायक अधिक्षक नजीर अहेमद, बी. एल. हाते, के. बी.
गायकवाड, डी. एस. सरदार, एम. एम. बेरजे, आत्मा यंत्रणेचे शेखर कदम आदींने प्रयत्न
केले. पिक विमा कक्षात शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी कृषि पिक विमा
कंपनीचे तालुका प्रतिनिधी रवी थोरात, लोकेश कांबळे यांनी नियुक्ती केली आहे.
00000
No comments:
Post a Comment