Wednesday, July 3, 2019

गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना



नांदेड, दि. 3 :-  उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 साठी  www.dtemaharashtra.gov.in / foreignscholarship2019 या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी शनिवार 13 जुलै 2019 पर्यंत सायं. 5.30 वाजेपर्यंत मुदत आहे. तर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्र, कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मुळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी सोमवार 15 जुलै 2019 पर्यंत उच्च शिक्षण विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.  
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी जे पदव्युत्तर, पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी THE (Time Higher Education) किंवा Qs (Quacquarelli Symonde) रॅकिंग 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेणार असतील अशा 20 विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्षे 2018-19 पासून राबविण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 4 ऑक्टोंबर 2018 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे.  
उच्च शिक्षण विभागामार्फत कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी दोन संच मंजूर आहेत. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून शैक्षणिक वर्षे सन 2019-20 साठी ही योजना राबविण्यात येत आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे नांदेड विभागीय कार्यालय येथे अर्ज सादर करावीत. तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाचे अर्ज तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाकडे सादर करावीत. इच्छूक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in / foreignscholarship2019 या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे, असे आवाहन उच्च शिक्षण नांदेड विभागाचे सहसंचालक डॉ. बळीराम लहाने यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...