पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 3
:- राज्याचे
पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 6 जुलै 2019 रोजी दादर रेल्वे स्थानक
येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय
वाहनाने नांदेड विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह
नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीस उपस्थिती.
स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह
नांदेड येथे राखीव. सायं. 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे
स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment