Wednesday, July 3, 2019

जिल्हातील सर्व गावांचे ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण होणार



नांदेड, दि. 3 :- राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख विभाग भारती सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राज्यातील गावठाण मापन झालेल्या सर्व गावांचे गावठाण भूमापनाचे काम ड्रोनच्या सहाय्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जुलै 2019 पासून नांदेड जिल्हयातील 1 हजार 203 गावांच्या गावठाण द्दीचे काम प्रत्यक्षपणे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांनी सर्वे करणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, असे अहवान नांदेड जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख श्रीमती सुरेखा सेठिया यांनी केले आहे.
याबाबतचा राज्य शासन ग्रामविकास विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे. याअनुषंगाने जीआयएस आधारे गावाच्या गाव ठाणातील मिळकतीचे सर्व्हेक्षण ुर्ण करुन संगणीकृत नकाशे मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. या योजनेमुळे जिल्हयातील प्रत्येक गावातील शासनाचे मालकीच्या मिळकतीचे संरक्षण, मिळकतीचा नकाशा सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याची नोंद होईल, ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल, गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण रोकता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकत धारकांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेत तरलता ये गावाची आर्थिक पत उंचावेल, ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख नकाशा उपलब्ध होईल, असेही जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख श्रीमती सेठिया यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...