Wednesday, July 3, 2019

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घ्यावे - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे



नांदेड, दि. 3 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी करुन घ्यावे यासाठी गावपातळीवर ग्रामसभा, चावडीवाचन आदी माध्यमाद्वारे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसुल, कृषि, जिल्हा परिषद तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधींना दिले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जिल्हा अग्रणी बँकचे नितीन कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकचे एम. टी. शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे किरण निकम, कृषि विकास अधिकारी कार्यालयाचे श्री शिरफुले, विमा कंपनीचे प्रतिनिधी गौतम कदम, सी.एस.सी. चे प्रतिनिधी सदाशिव पवार यांची उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी प्रधानमंत्री पिक विमा येाजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना तांत्रीक अडचणी आल्यास त्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तात्काळ दुर कराव्यात, अशा सुचना दिल्या.
यावेळी नांदेड जिल्ह्याची पावसाची वार्षीक सरासरी 955.55 मि.मी. एवढी आहे. जिल्हयाचे सर्वसाधारण क्षेत्र 8 लाख 24 हजार 820 हेक्टर असुन त्यापैकी 67,131 हेक्टर (8.14 टक्के) क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.  शासन निर्णय 22 मे 2019 नुसार खरीप हंगाम सन 2019 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हयात राबविण्यासाठी ॲग्रीकल्चर इंन्शुरस कंपनी ऑफ इंडिया मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) सहभागी होण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2019 आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. योजनेंतर्गत 70 जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी दिली. तर खरीप हंगाम 2019 मध्ये आतापर्यंत 900 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत अशी माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दिली.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...