Monday, December 7, 2020

 

आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी

9 डिसेंबरला विकेल ते पिकेल कार्यशाळा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  ‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्‍म खाद्य उद्योग उन्‍नयन योजना, केंद्र पुरस्‍कृत कृषि पायाभुत विकास निधी योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प या योजनेची जिल्‍हास्‍तरीय कार्यशाळा बुधवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्‍हा नियोजन सभागृह, येथे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली येथे होणार आहे.   

या कार्यशाळेसाठी जास्‍तीत जास्‍त आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक आत्‍मा रविशंकर चलवदे यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी जिल्‍हयातील नाबार्ड, पशुसंवर्धन, जिल्‍हा उद्योग केंद्र, माहिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा उपनिबंधक, मत्‍स्‍यविभाग, दुग्‍धव्‍यवसाय, जिल्‍हा अग्रणी व्‍यवस्‍थापक, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागातील अधिकारी यांची उपस्थिती आहे, असेही या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...