Thursday, July 12, 2018


नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड
श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या सभासद
निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 12 :- नांदेड शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणुकीची  मतदार यादी तयार करणे व प्रसिध्‍दीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार नोंदणीचे अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयात 20 जुलै ते 18 ऑगस्ट 2018 या कालावधीत करता येणार आहे. दिनांक 1 जुलै 2018 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्‍या मतदार यादीत ज्‍यांची नावे आहेत व जे सामान्‍यत: जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानचा भाग महाराष्‍ट्र राज्‍यात समाविष्‍ट केलेल्‍या भागात राहतात ( औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील) अशा सर्व शिख मतदारांना या निवडणूकीसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.    
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाची निवडणूक घेण्‍याचे शासनाने ठ‍रविले असून नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम 1956 च्‍या कलम 6 पोटकलम दोन अन्‍वये बोर्डाचे तीन सदस्‍य निवडून देण्‍यासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. मतदार यादीत आपले नाव दाखल करुन घेण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्‍यात आल्या आहेत. नियम तीन खाली शासनाने दिनांक 1 जूलै 2018 ही अर्हता तारीख निर्दिष्‍ट केली आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्‍यास पात्र असलेल्‍या मतदारांना दिनांक 20 जूलै 2018 या तारखेपासून 30 दिवसात त्‍यांचे नाव मतदार यादीत नोंदविता येईल. महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्‍या मतदार यादीत दिनांक 1 जुलै 2018 रोजी ज्‍यांची नावे आहेत व जे सामान्‍यत: जून्‍या हैद्राबाद संस्‍थानचा भाग महाराष्‍ट्र राज्‍यात समाविष्‍ट केलेल्‍या भागात राहतात. (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील) अशा सर्व शिख मतदारांना या निवडणूकीसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल. महाराष्‍ट्र राज्‍यात सामील झालेल्‍या भूतपुर्व हैद्राबाद राज्‍यांच्‍या भागात अर्थात  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील भाग हा मतदारसंघ आहे. सामान्‍यत: या क्षेत्राबाहेर राहणा-या शिख मतदारांना मतदार यादीत नांवे नोंदविता येणार नाहीत. मतदार यादीत नाव नोंदणीसाठीचे अर्जाचे नमुने संबंधीत तालुक्‍याच्‍या तहसीलदारांकडे देण्‍यात आले आहेत. मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठीचा अर्ज नमुना नं. 1 मध्‍ये संबं‍धीत तहसीलदार यांचेकडे दिनांक 20 जूलै 2018 ते दिनांक 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत स्विकारले जातील. प्रारुप मतदार यादी तयार झाल्‍यानंतर मतदार संघातील सर्व संबंधीत जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयात, जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) व गुरुव्‍दारा बोर्डाच्‍या कार्यालयात नियम आठ प्रमाणे उक्‍त मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल. नियम 9 व 10 प्रमाणे कार्यवाही झाल्‍यानंतर नियम 11 नुसार अंतिम मतदार यादी  प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
मतदार यादी कार्यक्रम
  • अर्हता दिनांक 1 जूलै 2018 रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदार यादी- महाराष्ट्र विधानसभेसाठी दिनांक 1 जूलै 2018 रोजी तयार केलेल्या व प्रसिध्द केलेल्या मतदारांच्या यादीवरुन.
  • मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-1 भरुन देणे (नियम 5)- दिनांक 20 जूलै ते 18 ऑगस्ट 2018 (30 दिवस) स्थळ संबंधीत तहसील कार्यालय. 
  • प्रारुप मतदार यादी तयार करणे ( नियम 6 7)- दिनांक 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2018 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी नांदेड.
  • प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे (नियम 8)- दिनांक 27 ऑगस्ट 2018.
  • दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी (नियम 9) फॉर्म-2 नुसार - दिनांक 28 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर 2018 सक्षम अधिकारी संबंधीत तहसीलदार.
  • दावे व हरकती निकाली काढणे (नियम 10 (i) ) - दिनांक 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2018 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी नांदेड.
  • जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्णयाविरुध्द अपील दाखल करण्याचा कालावधी ( नियम 10 (2) )- दिनांक 5 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोबर 2018 सक्षम अधिकारी विभागीय आयुक्त औरंगाबाद.
  • विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेली अपील प्रकरणे निकाली काढण्याचा कालावधी- दिनांक 20 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर 2018 सक्षम अधिकारी विभागीय आयुक्त औरंगाबाद.
  • अंतिम मतदार यादी प्रसिध्दीबाबत (नियम 11)- दिनांक 3 नोव्हेंबर 2018.

महाराष्‍ट्र शासन महसल व वन विभाग अधिसुचना क्रमांक जीयुआर-2018/ प्र.क्र.67/ज-7(अ) दिनांक 27 जून 2018 नुसार नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी 1 जलै 2018 रोजी महाराष्‍ट्र विधासभा मतदार यादी प्रसिध्‍द केल्‍यानुसार या यादीला अर्हता दिनांक मानुन औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या संपुर्ण जिल्‍हयांचा आणि चंद्रपुर जिल्‍हयातील राजुरा, कोरपना व जीवती या तालुक्‍यांचा समावेश होतो. सदर भाग हा तत्‍कालीन हैद्राबाद राज्‍यात समाविष्‍ट होता या भागातील शिख मतदार यादी तयार करण्‍याबाबत वरील प्रमाणे निर्देशीत  केल्‍यानुसार नांदेड शिख गुरुव्‍दारा श्री सचखंड हजूर अपचलनगर साहिब बोर्ड निवडणुक नियम 1963 मधील तरतुदीनुसार हा मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...