खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा
योजनेत सहभागासाठी 24 जुलै मुदत
शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे आवाहन
नांदेड, दि. 12
:- जिल्हयात खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2018 मध्ये
लागू करण्यात आला आहे. बँकेत पिक विमा
भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकऱ्यांसाठी 31 जुलै 2018 ही असुन बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 24
जुलै 2018 ही आहे. ज्या शेतकऱ्यांनी
पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे, आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हयात खरीप
हंगाम 2018 मध्ये ही योजना इफ्को टोकीओ जनरल
इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
पहिला मजला, आगळे मार्ग, डॉक्टर
लेन, नांदेड (दूरध्वनी क्र. 02462 / 247111) यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप
हंगाम सन 2017 मध्ये नांदेड जिल्हयामध्ये यशस्वीपणे
राबविण्यात आली असुन या योजनेंतर्गत रक्कम 542.752 कोटी
एवढी नुकसान भरपाई शेतक-यांना मिळाली आहे. मागील वर्षी शेतक-यांना ऑनलाईन विमा
भरतेवेळी तांत्रीक अडचणी आल्या होत्या. यावर्षी सदर परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही
याकरीता शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी अंतिम
तारखेची वाट न पाहता आतापासुनच ऑनलाईन पध्दतीने सीएससी सेंटरच्या
माध्यमातुन अथवा स्वत: अर्ज भरावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एकदम शेवटच्या
दिवशी विमा अर्ज भरण्यासाठी गेल्यास गर्दी होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरता न
आल्यास शेतक-यांना विम्याचा लाभ मिळणार नाही असे कृषि आयुक्तालयाने स्पष्ट केले
आहे.
शेतक-यांना विमा
अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजीटल
सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी
झाल्यास अंतिम मुदतीत ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत देखील
सहभागी होता येणार नाही. त्यामुळे
शेतक-यांनी मुदतीपुर्वीच बँकेत किंवा आपले
सरकार सेवा केंद्रावर पिक पेऱ्याचे स्वंयघोषणा
पत्र, सातबारा, 8-अ, आधारकार्ड,
बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर
करावेत.
प्रधानमंत्री पिक
विमा योजना खरीप हंगाम 2018 अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता
पीक
|
विमा संरक्षीत
रक्कम रु./हेक्टर
|
शेतकऱ्यांनी
भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)/ हेक्टर
|
भात
|
37,000/-
|
740/-
|
ख.ज्वार
|
24,000/-
|
480/-
|
तुर
|
31,500/-
|
630/-
|
मुग
|
18,900/-
|
378/-
|
उडीद
|
18,900/-
|
378/-
|
सोयाबीन
|
42,000/-
|
840/-
|
तीळ
|
23,100/-
|
462/-
|
कापुस
|
42,000/-
|
2100/-
|
इफको टोकीओ जनरल
इंन्शुरन्स कंपनी,
लिमीटेड कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनीधी यांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. जिल्हा प्रतिनिधी - सचिन तांबे, मोबाईल क्र - 8454944726, कपील दवणे, मोबाईल क्र - 9096696333 गौतम
जळबाजी कदम मोबाईल क्र -8329390770, 9890846283.
जिल्हा
|
तालुका
|
तालुका प्रतिनिधी
|
मोबाईल क्रमांक
|
|
नांदेड
|
हदगाव
|
मारेाती भालेराव
|
9049493100
|
9284217013
|
अर्धापूर
|
अनिल जगदाळे
|
9527491358
|
9325542080
|
|
नांदेड
|
नितीन कोल्हे
|
8999598376
|
9970202819
|
|
मुखेड
|
ज्ञानेश्वर हराळे
|
8600408454
|
7410712220
|
|
लोहा
|
पदमाकर आवळे
|
9823292660
|
7020835815
|
|
कंधार
|
दिपक बेटीवार
|
9011114171
|
8888333506
|
|
नायगाव
|
||||
देगलूर
|
सुनिल शिंदे
|
7066249548
|
7620837020
|
|
बिलोली
|
||||
भोकर
|
दत्तात्रय खिरे
|
9527213665
|
||
मुदखेड
|
||||
हिमायतनगर
|
सचिन घुले
|
7875063660
|
8329176485
|
|
किनवट
|
||||
माहूर
|
फुले खंडु
|
9049673962
|
7887757150
|
|
धर्माबाद
|
नागेश जाधव
|
7507829920
|
||
उमरी
|
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा
शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment