Friday, January 19, 2024

 वृत्त क्र. 61

सुट्टीच्या दिवशी असलेल्या शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी सुधारित वेळापत्रक  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- श्री राम लल्ला  प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सोमवार 22 जानेवारी 2024  रोजी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी 22 जानेवारी  रोजीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांचे या दिवसाचे सुधारित अपॉईंमेंट वेळापत्रक करण्यात आले आहे. तरी संबंधीत अर्जदाराने आपली अपॉईंटमेंट तारीख sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर तपासून मिळालेल्या दिनांकास शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी 22 जानेवारी 2024 रोजीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदार व वाहन मालक/चालक यांचे या दिवसाचे अपॉईंमेंट सुधारित वेळापत्रक  करण्यात आले आहे. तरी त्यांनी त्यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी सुट्टी लगतच्या पुढील सात दिवसात या कार्यालयाच्या मौजे वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे सादर करावेत. तसेच अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व अर्जदार व वाहनधारक यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...