Friday, January 19, 2024

 वृत्त क्र. 60

बारावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापकप्राचार्यशिक्षकविद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे कीउच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परिक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 22 जानेवारी 2024 कॉलेज लॉगईन मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावी परिक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेश पत्रावरील फोटोस्वाक्षरीविद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यावयाचे आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थीपालकशिक्षकमुख्याध्यापकप्राचार्यसर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावीअसे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...