Saturday, December 9, 2017

सधन कुक्कुट विकास गटासाठी
अर्ज करण्याची 30 डिसेंबर मुदत
नांदेड दि. 9 :- जिल्ह्यातील अर्धापूर तालुका वगळुन उर्वरीत 15 तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे सार्वजनीक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गट 50 टक्के अनुदानावर स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण, अनुसुचित जाती व जनजाती क्षेत्रातील लाभधारकाकडून अर्ज शनिवार 30 डिसेंबर 2017 पर्यंत मागविण्यात आले आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
अर्ज भरण्यासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे राहतील. सन 2017-18 पासून या योजनेंतर्गत सधन कुक्कुट विकास गटाची स्थान निश्चिती व लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सन 2018-19 पासून सन 2020-21 पर्यंत टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. प्रती तालुका एक लाभधारक निवडला जाईल. लाभार्थीकडे 2 हजार 500 चौ. फुट जागा स्वत:च्या मालकीची तसेच त्याठिकाणी दळणवळण, पाणी, विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी. प्रकल्प कार्यान्वित करताना अनुदान एकदाच देय असून त्यानंतर प्रकल्पाचा पुढील खर्च संपुर्ण लाभार्थ्यांना करावयाचा आहे. लाभधारकाने विहित नमुन्यात अर्ज भरुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेकडे शनिवार 30 डिसेंबर पर्यंत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...