Friday, July 24, 2020

वृत्त क्र. 675


पिक विमा भरण्यासाठी महा ई-सेवा,
सीएससी केंद्र 31 जुलैपर्यंत 24 तास सुरु
नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील उर्वरीत सर्व महा ई-सेवा केंद्र व सि.एस.सी केंद्र हे शुक्रवार 31 जुलै 2020 पर्यत 24 तास चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे.  यापुर्वी निर्गमीत केलेले निर्देश व अटी व शर्ती इतर दुकाने, आस्थापना जशाच तसे लागू राहतील.
शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी शिल्लक असलेला अत्यल्प कालावधीत विचारात घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहून नये यासाठी हा आदेश निर्गमीत केला आहे. जिल्हादंडाधिकारी यांनी 24 जुलै पासून निर्गमीत केलेल्या आदेशातील नियमावलीसह पुढील आदेशा पर्यंत नांदेड जिल्हा हा नॉन रेड झोनमध्ये आहे. या आदेशानुसार आस्थापने व दुकाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खाजगी आस्थापनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा दिली आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...