Friday, May 8, 2020


कंटेनमेंट झोन मधील नागरिकांच्या
समुपदेशनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड, (जिमाका) दि. 8 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील पाच कंटेनमेंट झोन मधील नागरिकांच्या समुपदेशानासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.  
महानगरपालिका हद्दीत कोविड 19 चे रुग्ण आढळून आल्यामुळे अशा क्षेत्रात संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कंटनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. या कंटनमेंट झोन पिरबुऱ्हाण येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) राजेंद्र शिंगणे. अंबानगर सांगवी येथे जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) व्ही. आर. पाटील. अबचलनगर येथे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, रहमतनगर येथे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर, लंगरसाहिब येथे मनपाचे सहाय्यक आयुक्त रितेश बैरागी या अधिकाऱ्यांची समुपदेशनासाठी नियुक्ती करण्यात आाली आहे.
कंटनमेंट क्षेत्रात रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशीलवार धोरण व करावयाचे उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आले असून त्याबाबत आरोग्य विभागाने कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने कंटनमेंट झोन मधील नगारिकांना मानसिक आधार देण्याच्यादृष्टिने समपुदेशन करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकारी हे वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांच्या अडचणीबाबत माहिती घेतील. नियुक्त समन्वय अधिकारी यांच्या समन्वयाने ते दूर करण्याची कार्यवाही करतील. नागरिकांना आजाराबाबत समुपदेशन करुन त्यांना मानसिक आधार देवून त्यांच्या कामाचे क्षणचित्रे काढतील. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या संनियंत्रणेत सोपविलेले कामे वेळेत जबाबदारीने पार पाडावीत. दररोज वेळोवेळी भेटी दिल्याचा अहवाल क्षणचित्रासह त्यांच्याकडे सादर करावा. तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय बिरादार, अव्वल कारकुन विजय महाजन हे याकामी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कक्षात सहाय्य करतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...