Friday, May 8, 2020


आतापर्यंत 1 हजार 376 स्वॅब निगेटिव्ह
63 व्यक्तींचा तपासणी अहवाल प्रलंबित  
बाधित 25 रुग्णांवर औषधोपचार सुरु प्रकृती स्थीर
नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  कोरोना विषाणु संदर्भात शुक्रवार 8 मे 2020 रोजी सायं 5 पर्यंत नांदेड जिल्ह्यात प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एकुण 93 हजार 623 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तर 1 हजार 502 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 376 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून 63 व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. तर यातील 38 व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
यापैकी सहा रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 25 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मृत झाले आहेत. शुक्रवार 8 मे रोजी रविनगर भागातील आणि एनआरआय भवन येथील 33 आणि इतर असे एकुण 63 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्याची आकडेवारी 
आत्तापर्यंत एकूण संशयित – 1601 एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 1492 क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 505 अजून निरीक्षणाखाली असलेले – 105 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 253 घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – 1239 आज तपासणीसाठी नमुने घेतले- 62 एकुण नमुने तपासणी- 1502 एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 38 पैकी निगेटीव्ह – 1376 नमुने तपासणी अहवाल बाकी- 63 नाकारण्यात आलेले नमुने – 5 अनिर्णित अहवाल – 19 कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 4 नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 93 हजार 623 असून त्यांना त्यांच्या घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...