Saturday, May 9, 2020


अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका ;
जम्मू काश्मीर येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह
रुग्णांची संख्या 40 वर पोहचली
नांदेड, (जिमाका) दि. 9 :- आज शनिवार 9 मे रोजी मध्यरात्री प्राप्त झालेल्या  54 थ्रोट स्वॅब नुसार 49 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. तर 3 अहवाल अनिर्णीत कळविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह दोन रुग्ण पुरुष असून त्यांचे वय 55 व 57 वर्ष आहे. हे जम्मू काश्मीर येथील रहिवासी असून नांदेड श्री गुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते.
सद्यस्थितीत सदर तिन्ही रुग्णांवर महसूल इमारत कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...