लॉकाडाऊनमुळे
अडकलेल्या नागरिकांना
वाहतूक
सुविधेची माहिती देण्यासाठी
राज्य
परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
नांदेड,
(जिमाका) दि. 8 :- लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या
नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक
सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण
कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-260621 असून यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन
राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
कोराना विषाणुचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी केला
आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्यात विविध भागात नागरिक अडकून
राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व
शर्तीवर परवानगी दिली आहे.
तसेच नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण
कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. विभाग
नियंत्रक अ. र. कचरे (कंसात भ्रमणध्वनी क्रमांक) कंसाबाहेर कार्यालयाचा दूरध्वनी
क्रमांक- (8275038417) 02462-260175. विभागीय वाहतूक अधिकारी सं. बा. वाळवे- (9422185619) 02462-260621. आगार प्रमुख (वरिष्ठ) नांदेड आगार पु. ता. व्यवहारे-
(9070706024) 02462-234466.आगार प्रमुख भोकर सु. धु. पवार (8390168613) 02467-202633. आगार प्रमुख किनवट मि. पु. सोनाळे (9881391958) 02469-222050.आगार प्रमुख मुखेड सं. तु. शिंदे (9307786083) 02461-202547. आगार प्रमुख देगलूर अ. रा. चव्हाण (7588523782) 9422878417. आगार
प्रमुख कंधार ह. म. ठाकुर (9823533890) 02466-223435.आगार प्रमुख हदगाव सं. बा. अकुलवार (9420461711) 02468-222344.आगार प्रमुख बिलोली च. र. समर्थवाड (8698094565), 02465-223323. आगार प्रमुख माहूर वि. तु. धुतमल (8668482504) 02460-268424 या संपर्क क्रमांकावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इच्छुक
नागरिकांनी प्रवासाबाबत संपर्क साधावा, असेही आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग
नियंत्रक यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment