Thursday, November 14, 2024

 वृत्त क्र. 1090

जात वैधता प्रमाणपत्र निकाली

काढण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विविध व्यावसायिक पाठयक्रमासाठी प्रवेशित एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जाती दावा प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी प्रकरणे त्वरीत निकाल काढण्यासाठी 14 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिम शिबिराचा मागासवर्गीय विद्यार्थी, पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रक्रर, उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांच्यावतीने करण्यात आले आहे.  

शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षामधील एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गातून प्रवेशित ज्या विद्यार्थ्याचे समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र जाती दावा प्रस्ताव दाखल होऊन त्रुटी पुर्तता अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व प्रकरणामध्ये विद्यार्थ्याचे जात वैधता प्रमाणपत्रा अभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीकडून त्यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच विद्यार्थी, पालक यांना त्यांच्या अडीअडचणीबाबत ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी 14 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत समितीमार्फत विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली रोड, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड-४३१६०४ येथे 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सन 2024 या कालावधीत सन 2024-25 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गातील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे त्यांचे ऑनलाईन भरलेले प्रस्ताव दाखल केलेले आहेत. परंतु प्रस्तावातील त्रुटी पुर्तता अभावी समितीकडे त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशा सर्व प्रकरणामध्ये समितीकडून अर्जदारांना ऑनलाईन प्रणालीद्वारे त्यांचे नमूद केलेल्या ईमेल आयडी द्वारे व संपर्क क्रमांकावर एसएमएसद्वारे त्रुटी पुर्तता करण्याबाबत कळविण्यात आले आहे. अशा प्रकरणांमध्ये अर्जदार, पालकांनी विशेष मोहीम शिबिराचा लाभ घेण्यासाठी समितीस्तरावर स्वत: समिती कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच त्यांच्या प्रस्तावातील ईमेलद्वारे कळविण्यात आलेल्या त्रुटीची पुर्तताबाबत मुळ कागदपत्रे अथवा साक्षाकिंत सादर करावेत. जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार समितीकडून त्वरीत तपासणीची कार्यवाही करुन संबंधित अर्जदारांना शिबिरादरम्यान जात वैधता प्रमाणपत्र निर्गमि‍त करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1093 लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५५ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल  उमेदवारांनी १८ तारखेपर्यंत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्...