Thursday, November 14, 2024

 वृत्त क्र. 1086

एसजीजीएस कॉलेजमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम

नांदेड, दि. १४ नोव्हेंबर:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानिमित्ताने  निवडणूक आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मतदारांमध्ये,  प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर आज विष्णूपुरी येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेमध्ये तहसील कार्यालयाच्या 087 स्वीप पथक आणि संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्यावतीने मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

कार्यक्रमात बाळासाहेब कच्छवे, संजय भालके,राजेश कुलकर्णी व शशिकांत घोरबाड यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही प्रणालीतील मतदानाच्या महत्त्वावर सखोल प्रकाश टाकला व मतदान प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले. तरुणांच्या सहभागामुळे लोकशाही अधिक बळकट होऊ शकते, यावर त्यांनी विशेष माहिती दिली. संस्थेचे अधिष्ठाता प्रा. संजय देठे यांनी विद्यार्थ्यांना सुजाण मतदार होण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये लोकशाहीबद्दल जागरूकता निर्माण झाली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी शपथ घेतली की, ते प्रत्येक निवडणुकीत मतदान करून लोकशाही मजबूत करतील. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातील सुजाण मतदार घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसचे प्रतिक सरोदे, ज्ञानेश्वरी सुर्वे, जयराम चिंचोले यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

०००००







No comments:

Post a Comment

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा

    वृत्त क्र.   1206 जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू   नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा ल...