Thursday, November 14, 2024

  वृत्त क्र. 1087

मतदान जनजागृतीसाठी नीमाचा पुढाकार

नांदेड, दि. १४ नोव्हेंबर:- मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) यांच्यामार्फत मतदानाच्या दिवशी मतदान करुन शाई बोटाला दाखविल्यास त्या दिवशी बाह्यरुग्ण तपासणीच्या शुल्कात 30 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने नांदेड जिल्ह्यातील निमा (NIMA) संघटनेतर्फे शहरातील व जिल्ह्यातील निमा अंतर्गत सदस्यांना रुग्णालयात मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 या एका दिवशीसाठी ज्या नागरिकांच्या बोटाला मतदान केल्याची शाई असेल, त्यांना सर्व खाजगी रुग्णालयातील निमा अंतर्गत सदस्याच्या बाह्यरुग्ण तपासणीच्या शुल्कामध्ये 30 टक्के सुट देण्यात येणार आहे. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...