Thursday, November 14, 2024

 वृत्त क्र. 1089

खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनीही लावली नांदेडची दौड

मतदान वाढीसाठी युवकांची शहरात मॅराथॉन    

* स्विप व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम 

* स्केटर्सने वेधले लक्ष, विजेत्यांना मिळाले बक्षिस   

नांदेड दि. 14 नोव्हेंबर :-  नांदेड शहरवासियांनी मतदानाकडे दूर्लक्ष करू नये यासाठी प्रशासनाने गुरूवारी सकाळी नांदेडच्या प्रमुख रस्त्यांवर मॅराथॉनचे आयोजन केले होते. या शर्यतीत शेकडो युवकांनी भाग घेतला. विशेषत: मुलींनी घेतलेला भाग आणि स्केटर्सनी ही शर्यत स्केटींग करून लक्ष वेधले. 

जिल्हा स्विप कक्ष, 87-दक्षिण नांदेड, 86- उत्तर नांदेड कक्ष तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा प्रबोधिनी, नांदेड जिल्हा हौशी ॲथेलेटिक्स संघटना तसेच विविध संघटनांच्या सहभागातून आज गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा कार्यालयापर्यंत मॅराथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यामध्ये गुजराथ कॅडरचे आयआरएस अधिकारी तथा निवडणूक खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनीही पूर्ण मॅराथॉन पूर्ण केली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे व अन्य अधिकारीही या जनजागृती मोहिमेत सहभागी झाले. 

भल्या पहाटे तरुणांचे जत्थे आज या मॅराथॉनमध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रथम भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदारांच्या प्रतिज्ञेचे निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थित वाचन करण्यात आले. यावेळी उपायुक्त संजय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे, जिल्हा शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी दिलीप बन्सोडे , मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकेटेश चौधरी,जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, उप अभियंता गोकुळे , गटशिक्षणाधिकारी आडे, प्रलोभ कुळकर्णी, शुभम तेलेवार,राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी राहूल श्रीरामवार, विपूल दाभके, दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, सुभाष धोंगडे उर्फ शक्ती, विद्यानंद भालेराव, शेख अक्रम, मोहन प्रवार, चंदू गव्हाणे, जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे पंच बंटी सोनसळे, वैभव दमकोंडवार, गोविंद पांचाळ, शिद्धोधन नरवाडे, वैभव अंभोरे, गजानन फुलारी, कपील सोनकांबळे, नांदेड उत्तरचे सुनिल मुत्तेपवार, माणिक भोसले, संभाजी पोकले, शिवराज पवार, मुकुंद आळसपुरे, सौ. आशा पोले तर नांदेड दक्षिणचे श्री. आडे, हनुमंत राठोड, सारिका आचमे, सुनिल दाचावार, डॉ. डी. एम. बडुरे, डॉ. व्ही. एल. तरोडे, एस. के. ढवळे, एस. डी. लबडे यांची उपस्थिती होती. 

 मॅराथॉन विजेते 

आज झालेल्या मॅराथॉनमध्ये पुरुष गटात रोहन देवानंद लोणे ( प्रथम ) सुमीत शिवाजीराव ढगे ( व्दीतीय ) कपील त्र्यंबक पवार ( तृतीय )तर महिला गटात नेहा साईनाथ पंदेलवार ( प्रथम ) रूपाली संतोष ढाले ( व्दीतीय ) मिनाक्षी दतात्रय दमयावार ( तृतीय ) विजयी झाले.

0000




















No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...