Thursday, November 14, 2024

 वृत्त क्र. 1085

स्वीपच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी बारड येथे महिला मेळावा

उपस्थिताना मतदानाची शपथ दिली

नांदेड, १४ नोव्हेंबर:- जिल्हा परिषद हायस्कुल बारड, ता. मुदखेड येथे स्विप कक्षामार्फत मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याची सुरुवात ही  मी मतदान करणारच स्वाक्षरीपटाने करण्यात आली. स्वाक्षरी करताना महिला मतदारामध्ये उत्साह दिसून आला.

स्वाक्षरीनंतर लगेच महिलांनी सेल्फी काढला. सर्व महिला हिरीरीने सेल्फी पॉईंट वर सेल्फी काढण्यासाठी रांगा लावून उपस्थित होत्या. महिला मेळाव्यात महिलां मतदारांना मतदान कसे करावे याची माहिती देण्यात आली.

Voter helpline व app चा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. व वापर करण्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आले. उपस्थित मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली. मानवी साखळी तयार करून आधी मतदान, मगच काम अशा घोषणा देण्यात आल्या.

शाळेतील बेसबॉल मुलींचा संघ ही राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याने सर्व संघाचा सहभाग घेऊन फळीवर मी मतदान करणारच असे लिहून खेळाची सुरुवात करण्यात आली.

या मेळाव्यास स्विप कक्ष प्रमुख सुरेश पाटील, नितीन दुगाने, विजय मस्के व शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती तळनकर व सर्व स्टाफ उपस्थित होते.

००००००












No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...