महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमांतून प्रसारित होणार आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता ही मुलाखत पाहता येईल.
तसेच आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि. ६, ७, ९ व १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखतीचे प्रसारण होईल.

No comments:
Post a Comment