Friday, November 6, 2026

 वृत्त क्रमांक

दुष्काळग्रस्त 87 लाख 45 हजार शेतकऱ्यांना 4,372 कोटींची दिवाळी अग्रीम मदत -मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत

नांदेड जिल्ह्यातील 5 लाख 62 हजार 868 शेतकऱ्यांना 281 कोटी 43 लाख रुपये वितरीत

मुंबई, दि. 6 : राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. यानुसार 5 नोव्हेंबर 2026 अखेर राज्यातील 87 लाख 45 हजार 669 शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार 372 कोटी 83 लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत वितरित झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास त्या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबववून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यावर भर देण्यात आला. या मदतीमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.

विभागनिहाय आणि जिल्हानिहाय मदत वितरण

अमरावती विभागातील 12 लाख 82 हजार 203 शेतकऱ्यांच्या खात्यात 641 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील 1 लाख 62 हजार 152 शेतकऱ्यांना 81 कोटी 8 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यातील 3 लाख 6 हजार 709 शेतकऱ्यांना 153 कोटी 35 लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 4 लाख 25 हजार 833 शेतकऱ्यांना 212 कोटी 92 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 508 शेतकऱ्यांना 79 कोटी 75 लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 28 हजार 1 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागातील 33 लाख 36 हजार 360 शेतकऱ्यांच्या खात्यात 1668 कोटी 18 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील 6 लाख 12 हजार 93 शेतकऱ्यांना 306 कोटी 5 लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 लाख 44 हजार 382 शेतकऱ्यांना 222 कोटी 19 लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 3 लाख 47 हजार 72 शेतकऱ्यांना 173 कोटी 54 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2 लाख 12 हजार 760 शेतकऱ्यांना 106 कोटी 38 लाख रुपये, जालना जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 844 शेतकऱ्यांना 219 कोटी 42 लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील 3 लाख 81 हजार 961 शेतकऱ्यांना 190 कोटी 98 लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील 5 लाख 62 हजार 868 शेतकऱ्यांना 281 कोटी 43 लाख रुपये आणि परभणी जिल्ह्यातील 3 लाख 36 हजार 380 शेतकऱ्यांना 168 कोटी 19 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

कोकण विभागातील 63 हजार 647 शेतकऱ्यांच्या खात्यात 31 कोटी 82 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील 8 हजार 213 शेतकऱ्यांना 4 कोटी 11 लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील 2 हजार 218 शेतकऱ्यांना 1 कोटी 11 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 22 हजार 494 शेतकऱ्यांना 11 कोटी 25 लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 हजार 722 शेतकऱ्यांना 15 कोटी 36 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

नागपूर विभागातील 7 लाख 50 हजार 41 शेतकऱ्यांच्या खात्यात 375 कोटी 2 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील 1 लाख 158 शेतकऱ्यांना 50 कोटी 8 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख 629 शेतकऱ्यांना 100 कोटी 31 लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 30 हजार 788 शेतकऱ्यांना 15 कोटी 39 लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 74 हजार 910 शेतकऱ्यांना 37 कोटी 46 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 766 शेतकऱ्यांना 96 कोटी 38 लाख रुपये आणि वर्धा जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार 790 शेतकऱ्यांना 75 कोटी 40 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

नाशिक विभागातील 18 लाख 7 हजार 32 शेतकऱ्यांच्या खात्यात 903 कोटी 52 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 लाख 7 हजार 284 शेतकऱ्यांना 403 कोटी 64 लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील 65 हजार 930 शेतकऱ्यांना 32 कोटी 97 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील 4 लाख 8 हजार 635 शेतकऱ्यांना 204 कोटी 32 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 534 शेतकऱ्यांना 53 कोटी 77 लाख रुपये आणि नाशिक जिल्ह्यातील 4 लाख 17 हजार 649 शेतकऱ्यांना 208 कोटी 82 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

पुणे विभागातील 15 लाख 6 हजार 386 शेतकऱ्यांच्या खात्यात 753 कोटी 19 लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 74 हजार 893 शेतकऱ्यांना 37 कोटी 45 लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील 3 लाख 28 हजार 542 शेतकऱ्यांना 164 कोटी 27 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील 2 लाख 6 हजार 600 शेतकऱ्यांना 103 कोटी 30 लाख रुपये, सातारा जिल्ह्यातील 3 लाख 1 हजार 467 शेतकऱ्यांना 150 कोटी 73 लाख रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 5 लाख 94 हजार 884 शेतकऱ्यांना 297 कोटी 44 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करून त्यांना अग्रीम मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले. 

***

No comments:

Post a Comment

महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्...