वृत्त क्रमांक
शस्त्र परवान्यांचे 31 डिसेंबरपूर्वी नूतनीकरण करा
जिल्हाधिकारी कार्यालयाचे परवानाधारकांना आवाहन
नांदेड, दि. 6 : जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवान्यांची मुदत 31 डिसेंबर 2026 रोजी संपत आहे, अशा परवानाधारकांनी मुदतीपूर्वी परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने केले आहे.
नूतनीकरणासाठी नियमानुसार शुल्क चलनाद्वारे शासनाकडे जमा करणे आणि परवान्यात नमूद अग्निशस्त्राची जिल्हादंडाधिकारी कार्यालयात पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा एक फोटो आणि शस्त्र परवान्याची छायांकित प्रत जोडून जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत सादर करावी.
संबंधित परवानाधारकांनी नूतनीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment