Thursday, October 15, 2026

वृत्त क्रमांक

साबणाने हात धुणे हे आजार प्रतिबंधाचे प्रभावी साधन

• खैरगाव व आमदाबाद तांडा येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जनजागृती

नांदेड (जिमाका), दि. 15 : संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. हात धुण्याची सवय दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास अनेक आजारांना प्रतिबंध करता येतो, असे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यू. डी. तोटावाड यांनी केले.

जागतिक हात धुवा दिनानिमित्त अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी एस. पी. गोखले, पी. एन. गर्जे, बालाजी गव्हाणे, दत्ता नांद्रे, संजय गोवंडे, प्रकाश इंगोले, माणिकराव सोळंके, धोंडीबा कल्याणकर, ग्रामपंचायत अधिकारी सदानंद मुधोळकर, मुख्याध्यापक शेख खमरोद्दीन, गजानन कल्याणकर, निळकंठ भोसले, कामाजी एडके आणि धाराजी कदम आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी तोटावाड यांनी गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. माहिती, शिक्षण व संवाद पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच हात धुण्याच्या विविध टप्प्यांची माहिती देऊन स्वच्छतेच्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर गटविकास अधिकारी तोटावाड यांनी खैरगाव येथील धारा दुग्ध उत्पादक सहायता गटाला भेट देऊन गटामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्र, हळद-मिरची कांडप यंत्र आणि शेवया तयार करण्याच्या यंत्राची पाहणी केली. त्यांनी महिला सदस्यांशी संवाद साधला. तसेच अंगणवाडीलाही भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन केले.

आमदाबाद तांडा येथेही हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जागतिक हात धुवा दिनानिमित्त आमदाबाद तांडा येथेही विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी यू. डी. तोटावाड, मिलिंद व्यवहारे, बायजाबाई देवराव पवार, इंदुबाई मधुकर पवार, काशाबाई दुर्गम, शिक्षिका भारतीबाई चंदर राठोड, अंगणवाडी कार्यकर्ती प्रतिभा लक्ष्मीकांत पांचाळ, पोलीस पाटील सुमनबाई शेषेराव चव्हाण, प्रियंका उदय चव्हाण, ज्योतीबाई कृष्णा राठोड, रंगराव सिताराम पवार, परसराम भजनु आडे, अशोक भिकु पवार, बालाजी गोविंद राठोड आदी उपस्थित होते.

***









No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   दुष्काळी परिस्थिती व पाणीपुरवठा योजनांचा घेणार आढावा पशुधनासाठी चारा ...