वृत्त क्रमांक
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, आढावा बैठक व महाआरोग्य शिबिरास उपस्थिती
नांदेड (जिमाका), दि. २५ : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर कंधार तालुक्यातील शिराढोण येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे हे दुपारी १२ वाजता हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजता नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी दौऱ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहतील.
दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून ते कंधार तालुक्यातील शिराढोण येथील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय परिसर येथे लोकनेते कै. माधवराव पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमस्थळावरून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करून सायंकाळी ५.४५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment