Thursday, August 8, 2019


               स्पर्धा परीक्षेची तयारी करताना इंग्रजी विषयाची भिती बाळगु नये
                                                                 --प्रा.संतोष पवार
नांदेड, दि. 7:-  स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना विधार्थ्यांनी इंग्रजी विषयाची भिती न बाळगता नियोजनपूर्वक अभ्यास  केल्यास यश हमखास मिळेल परंतु त्यासाठी विदयार्थ्यांने स्वत:ला झोकुन देऊन परीक्षेची तयारी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.संतोष पवार,पुणे यांनी केले. ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने उज्ज्वल नांदेड मोहीमे अंतर्गंत आयोजीत दरमाह 5 ता. च्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विधार्थ्यानां मार्गदर्शन करीत होते.
सदर शिबीराला श्री.बळवंत वरपडे, जिल्हा ग्रंथालय अ‍धिकारी आशिष ढोक यांची उपस्थिती होती प्रास्ताविक व व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी करुन दिला. सुत्रसंचालन व आभार मुक्तिराम शेळके यांनी मानले.शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी बाळू पावडे, कोडिंबा गाडेवाड रघुविर व खंडेलोटे यांनी सहाय्य केले.
0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...