महाराष्ट्र
जमीन महसूल
अधिसूचनेबाबत
आवाहन
नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र
शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब दि. 30 मे, 2019 रोजी अधिसूचना प्रसिध्द
झाली आहे. या नियमांना, महाराष्ट्र जमीन
महसुल (सरकारी
जमिनीची विल्हेवाट करणे) (सुधारणा) नियम, 2019 असे म्हणावे. महाराष्ट्र जमीन महसुल (सरकारी
जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 31 च्या
खालील स्पष्टीकरण ऐवजी नंतर पुढील स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात येत आहे.
स्पष्टीकरण :- या नियमांच्या प्रयोजनार्थ
अनार्जित रक्कम म्हणजे प्रत्यक्ष विक्रीद्वारे मिळालेली रक्कम आणि त्यातून
खालील रक्कम वजा जाता शिल्लक राहिलेली रक्कम.संबंधित शासकीय जमीन प्रदाना समयी
शासनास अदा केलेली कब्जेहक्काची रक्कम, किंवा अशा विक्री पुर्वी सदर जमीन खरेदी
केली असेल तर अशा खरेदीची रक्कम, अधिक अशा जमिनीमध्ये सुधारणा करण्याकरिता तसेच
जमिनीचा धारणाधिकार वृध्दींगत करण्याकरिता
किंवा वापरातील बदलीसाठी शासनास अदा केलेली रक्कम यांचा समावेश राहील, असे
जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment