महाराष्ट्र
सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा
समितीच्या
बैठकीचे औरंगाबाद येथे रविवारी आयोजन
नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा समितीची विभागवार
बैठक औरंगाबाद येथे रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयाच्या
स्व. विजयेंद्र काबरा स्मृती सभागृहात सकाळी 11 वा. आयोजित केली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक
ग्रंथालये अधिनियम 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम 1)
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहाय्यक अनुदान व इमारत व साधनसामग्री अनुदाने
यासाठी मान्यता) नियम 1970. 2) महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक
अनुदानासाठी मान्यता देणे) नियम 1971. 3) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य
ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपद्धती) नियम, 1973. 4)
महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथालय) सहायक
अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम 1974 यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा
निर्णय शासनाने घेतला असून यासयाठी ग्रंथालय संचालक सु. हि. राठोड यांचे
अध्यक्षतेखाली सुधारणा समिती गठीत केली आहे.
या बैठकीसाठी औरंगाबाद
विभागातील शासनमान्य जिल्हा व तालुका ग्रंथालयांचे अध्यक्ष कार्यवाह, ग्रंथालय,
सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कार्यवाह, ग्रंथ / ग्रंथालय चळवळीशी संबंधीत
स्थानिक लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक/ प्रतिनिधी, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ
विक्रेते, वाचक व सभासद, विद्यापीठ, महाविद्यालयीन, शालेय ग्रंथपाल / प्राध्यापक,
ग्रंथालय संचालनालयातील माजी अधिकारी आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन समिती सदस्य
तथा सहायक ग्रंथालय संचालक सु. सं. हुसे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment