Thursday, August 8, 2019


 " युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही "
नांदेड जिल्हयात युवा संसद या कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

नांदेड, दि. 8 :- राष्ट्र उभारणीकरीता युवा शक्तीचा विधायक हिस्सा वाढविण्यासाठी तसेच युवांचे विचार अपेक्षा जाणून घेऊन राष्ट्रीय राज्य निर्माणामध्ये सामाजिक कार्यासाठी युवांना प्रोत्साहीत करुन त्यांचेमधील नेतृत्व गुणांचा विकास, प्रगल्भपणे विचार करण्याची दृष्टी नवसंकल्पना मांडण्याची संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या हेतूने " युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही " या कार्यक्रमाचे आयोजन शासनामार्फत राज्यस्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.
" युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही " राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रम अंतर्गत सन 2019-20 या वर्षात वक्तृत्व स्पर्धा युवा संसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मा.शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद,नांदेड  यांच्या अध्यक्षतेखाली आज दिं.05/08/2019 रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस जिल्हयातील 16 गटशिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधु, प्रवीण कोंडेकर, लेखा लिपीक आनंद सुरेकर, समितीची सदस्य श्री.वैजनाथ स्वामी, श्री.विष्णु गोडबोले, प्राचार्य, मुख्याध्यापक, तालुका क्रीडा संयोजक, आदी उपस्थित होते.
            या बैठकीत युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही या कार्यक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयस्तर ते राज्यस्तर युवा संसद कार्यक्रमाची सविस्तर माहिती किशोर पाठक, क्रीडा अधिकारी श्री.माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी यांनी दिली. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर दिनांक 13 ते 14 ऑगष्ट,2019 या कालावधीत खालील विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील वक्तृत्व स्पर्धा 1. प्रधानमंत्री जन-धन योजना  2. स्वच्छ भारत अभियान  3. निर्मल ग्राम अभियान  4. श्रमदान  5.प्रधानमंत्री उज्वला योजना  6. आयुष्यमान भारत  7. सर्वांसाठी घरे  8. सेवा हमी कायदा  9. मुद्रा योजना  10.पिक विमा योजना 11. मुख्यमंत्री/ प्रधानमंत्री सडक योजना  12. जलयुक्त शिवार अभियान  13. कौशल्य विकास कार्यक्रम  14. सुप्रशासन  15.भारताची चंद्रयान मोहीम या विषयावर इयत्ता 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांकरीता करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील तालुका गटशिक्षणाधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा संयोजक यांनी आपल्यास्तरावर कनिष्ठ महाविद्यालय गट/ तालुकास्तरावरील स्पर्धेचे आयोजन-नियोजन करावे, अशी सुचना शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्या वतीने देण्यात आली. याकरीता नोडल ऑफीसर म्हणुन मा.शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद,नांदेड हे आहेत.
तालुका/ गटस्तरीय वक्तृत्व स्पर्धेकरीता महाविद्यालयातुन प्रथम, द्वितीय तृतिय क्रमांक प्राप्त केलेल्या स्पर्धकांनी दिनांक 19 ते 20 ऑगष्ट, 2019 या कालावधीत पुढीलप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरावरील स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे. तालुकास्तर स्पर्धा 1. नांदेड (ग्रामिण)-  इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सिडको, नांदेड, 2. नांदेड (शहर)- एन.एस.बी.कॉलेज, तारासींग मार्केट,नांदेड  3. अर्धापुर, मुदखेड भोकर- महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, मुदखेड, 4. लोहा- कै.विश्वनाथराव नळगे मा. उ.मा.विद्यालय, लोहा  5. कंधार- श्री शिवाजी कॉलेज,कंधार जि.नांदेड  6. मुखेड नायगांव- शाहीर अण्णाभाऊ साठे कनिष्ठ महाविद्यालय, मुखेड  7. देगलुर बिलोली- देगलुर कॉलेज,देगलुर  8. धर्माबाद उमरी - लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, 9. किनवट हिमायतनगर- बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय, किनवट  10. माहुर हदगांव- जगदंबा कनिष्ठ महाविद्यालय, माहुर या ठिकाणी आयोजन करण्याचे निश्चित झालेले आहे. या गटस्तरावरील स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना (प्रथम रु 3000/-, द्वितीय रु 2000/-, तृतीय रु 1000/- ) या प्रमाणे रोख पारितोषिक, प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय  युवा संसद स्पर्धेकरीता गटस्तरातुन (तालुका) प्रथम, द्वितीय तृतिय स्पर्धकांनी जिल्हास्तरावर दिनांक 23 ते 24 ऑगष्ट,2019 या कालावधीत ÷ करण्याचे निश्चित झालेले आहे. सदर स्पर्धेचे वेळापत्रक शासन निर्णयाप्रमाणे राहील.
जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त करणा-या स्पर्धकांना (प्रथम रु 10,000/-, द्वितीय रु 7,000/-, तृतीय रु 5000/-) या प्रमाणे रोख पारितोषीक, प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यामधुन प्राविण्य प्राप्त प्रथम, द्वितीय तृतिय स्पर्धकांना राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
तरी नांदेड जिल्हयातील प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 12 मध्ये शिकत असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणेसाठी प्रोत्साहीत करुन आपल्या महाविद्यालयात यशस्वी आयोजन करावे. अधिक माहितीसाठी श्री.किशोर पाठक, क्रीडा अधिकारी, श्री.माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.कुंडगीर, मा.शिक्षणाधिकारी (माध्य) राजेश्वर मारावार, जिल्हा क्रीडा अधिकारी समिती सदस्य यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...