Thursday, August 8, 2019


19 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड, दि. 7:-  राज्यात सर्व जिल्ह्यात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात यावे जर या दिवशी  सार्वजनिक शासकीय सुट्टी असल्यास  त्यानंतर येणारा  कामकाजाचा  दिवस  म्हणून  पाळण्यात येईल असे आदेशित केलेले आहे.
त्‍या अनुषंगाने या ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि.19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11-00  वाजता उक्‍त महिला लोकशाही दिन ‍जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवन,‍ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे आयोजित केला आहे. तरी  संबंधित  समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे.
            तसेच समस्याग्रस्त व पिडीत  महिलांनी,  महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहीत  नमुन्यात  सादर  करावेत, असे आवाहन  महिला  लोकशाही दिन  समितीचे  अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी व सदस्य सचिव तथा जिल्हा  महिला    बालविकास अधिकारी,  नांदेड, यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...