Thursday, August 8, 2019


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
 
          नांदेड, दि. 7:-  जिल्हा परिषद कृषि विभागा मार्फत  सन 2019-20 या वर्षाकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने  अंतर्गत अनुसूचीत जाती/नवबौध्द शेतकऱ्यांना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील) अंतर्गत अनु.जमातीच्या शेतकऱ्यांना  शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजने  अंतर्गत लाभार्थी निवडी करीता आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तरी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी योजने अंतर्गत लाभ घेणेसाठी ऑनलाईन अर्ज/ प्रस्ताव www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेत स्थळावर गट विकास अधिकारी पंचायत समिती मुदखेड यांचेकडे दिनांक  05 ऑगस्ट, 2019 ते 04 सप्टेंबर, 2019 पर्यंत सादर करुन प्रस्तावाची मुळ प्रत आवश्यकत्या सर्व कागदपत्रासह कृषि अधिकारी (विघयो) पंचायत समिती यांचेकडे जमा करावी, असे आवाहन सभापती सौ. शिवकांता शत्रुघ्न गंड्रस, उप सभापती आनंदा रामजी गादीलवाड, गट विकास अधिकारी, चंद्रशेखर जगताप कृषि अधिकारी पी.बी. गुरुपवार यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रतेच्या अटी खालील प्रमाणे आहेत.

लाभार्थी निवडीचे अटी शर्ती:-
लाभार्थी शेतकऱ्याने अर्ज विहीत नमुन्यात सादर करावा.त्यामध्ये योजने अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कोणत्याही एकाच पॅकेजची मागणी करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी   हा अनुसूचित जाती नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असला पाहिजे. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाण पत्र असले पाहिजे.शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत: च्या नांवे जमीन धारणेचा 7/12 दाखला 8- चा उतारा असणे आवश्यक आहे. नविन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत: च्या नावे किमान 0.40 हेक्टर नविन विहीर खोदने ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.  या योजने अंतर्गत लाभ घेणेसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर राहील. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50,000/- पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून सन 2018-19 चे उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. ग्रामसभेने शिफारस केलेल्या ठरावाची प्रत जोडावी. प्रस्ताव धारक अनु.जाती/नवबौध्द शेतकऱ्यांने या पूर्वी विशेष घटक योजना/डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनु.जमातीच्या शेतकऱ्या ओटीएसपी / टिएसपी योजने स्वत: किंवा कुटंबातील सदस्याने नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या घटकांचा त्या सोबतच्या पॅकेज अंतर्गत समाविष्ट असलेल्या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.

योजने अंतर्गत लाभ दयावयाचे घटक देय अनुदान मर्यादा:-
अ. क्र.
बाब / घटक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये)
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत क्षेत्राबाहेरील)  अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये)
1
नवीन विहीर
2,50,000/-
2,50,000/-
2
जुनी विहीर दुरुस्ती
50,000/-
50,000/-
3
इनवेल बोअरींग
20,000/-
20,000/-
4
वीज जोडणी आकार
10,000/-
10,000/-
5
शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण
1,00,000/-
1,00,000/-
6
सुक्ष्म सिंचन संच:-
अ. ठिबक सिंचन
ब. तुषार सिंचन

50,000/-
25,000/-

50,000/-
25,000/-
7
परसबाग
---
500/-
8
पंप संच
20,000/- (10 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंप संच करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार 100 टक्के अनुदान देय राहिल.)
20,000/- (10 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंप संच करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार 100 टक्के अनुदान देय राहिल.)
9
पीव्हीसी / एचडीपीई पाईप
--
30,000/- (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या 100 टक्के किंवा उच्चतम मर्यादा रु.30000/-)
वरील घटकामधून नविन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज या तीन पॅकेज मधील एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क  साधावा.
0000

No comments:

Post a Comment

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...