Thursday, August 8, 2019


               स्पर्धा परीक्षेची तयारी करताना इंग्रजी विषयाची भिती बाळगु नये
                                                                 --प्रा.संतोष पवार
नांदेड, दि. 7:-  स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना विधार्थ्यांनी इंग्रजी विषयाची भिती बाळगता नियोजनपूर्वक अभ्यास  केल्यास यश हमखास मिळेल परंतु त्यासाठी विदयार्थ्यांने स्वत:ला झोकुन देऊन परीक्षेची तयारी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.संतोष पवार,पुणे यांनी केले. ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने उज्ज्वल नांदेड मोहीमे अंतर्गंत आयोजीत दरमाह 5 ता. च्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विधार्थ्यानां मार्गदर्शन करीत होते.
सदर शिबीराला श्री.बळवंत वरपडे, जिल्हा ग्रंथालय धिकारी आशिष ढोक यांची उपस्थिती होती प्रास्ताविक व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी करुन दिला. सुत्रसंचालन आभार मुक्तिराम शेळके यांनी मानले.शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी बाळू पावडे, कोडिंबा गाडेवाड रघुविर खंडेलोटे यांनी सहाय्य केले.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...