Thursday, December 7, 2017

माहिती कार्यालयांतील वर्ग -
संवर्गातील पदांसाठी मुलाखती
            नांदेड, दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागातील वर्ग-ची रिक्त पदे भरण्याबाबत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी शासन नियमानुसार तयार करण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयात सूचना फलकावर लटकवण्यात आल्या आहेत.
पात्र उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी तोंडी मुलाखतीसाठी बुधवार 20 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता संचालक (माहिती) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, अरिहंत बिल्डींग, सिटी सर्व्हे क्र. 2714, हॉटेल सिटीजन्स समोरील गल्ली, खडकेश्वर, औरंगाबाद- 431001 या पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन, औरंगाबाद विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...