Thursday, December 7, 2017

बीटी कापसाचे तंत्रज्ञान वापरुन
बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करावा
- कृषि संचालक डॉ. जाधव
नांदेड, दि. 7 :- शेतकऱ्याने बी. टी. कापसाच्या कडेला बिगर बी. टी. कापसाची लागवड केल्याने शेंदरी बोंड अळीचा कमी प्रादुर्भाव दिसून आला आहे. बी. टी. कापसाचे तंत्रज्ञान योग्य राबविल्याने कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार) डॉ. सु. ल. जाधव यांनी श्री. कदम या शेतकऱ्याचे कौतुक केले असून इतर शेतकऱ्यांनी याप्रमाणे तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. 
कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार) डॉ. जाधव यांनी वारंगाफाटा येथील बालाजी भिमराव कदम यांच्या बी.टी. कापसाची पाहणी नुकतीच केली आहे. भारतात सन 2002 मध्ये बी. टी. कापसाचे तंत्रज्ञान आले. बि.टी. कापूस खरेदी करताना बी. टी. कापसाबरोबर नॉन बी. टी. कापसाचे बियाणे मिळत असते. बी.टी. कापसाच्या चारही बाजूने नॉन बीटीचे बियाणे लावायचे असते. कापसावरील बोंड अळ्या बी. टी. कापसाला प्रतिकारक्षम बनू नये म्हणून ही लागवड करायची असते. शेतकऱ्यांनी नॉन बी. टी. चे बियाणे फेकुण देऊ नाही. कापसाचा हंगाम संपल्यानंतर फरदड कापूस घेतल्यामुळे शेंदरी बोंड अळी आता बी. टी. कापसावर हल्ला करु लागल्याने शेतकऱ्याने बी. टी. कापसाच्या चारही बाजूने बी. टी. कापूस लावण्याचे व फरदड कापूस न घेण्याचा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला. ज्या ठिकाणी शेंदरी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे असा कापूस उपटून नष्ट करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...