Thursday, December 7, 2017

अतिविलंब शुल्काने 12 वी परीक्षेचे
अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर
नांदेड, दि. 7 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी फेब्रुवारी, मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षेस नियमीत, पुर्नपरिक्षार्थी, तुरळक विषय श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे  अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
इयत्ता 12 वी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 50 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे शनिवार 2 डिसेंबर ते सोमवार 1 जानेवारी 2018 पर्यंत. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 100 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे मंगळवार 2 जानेवारी ते 16 जानेवारी 2018 पर्यंत. तर अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे बुधवार 17 जानेवारी ते 31 जानेवारी 2018 पर्यंत राहील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...