Thursday, December 7, 2017

खाजगीरित्या प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे
 नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध   
नांदेड, दि. 7 :- फेब्रुवारी-मार्च 2018 मधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र दहावीसाठी http://from17.mh-ssc.ac.in व बारावीसाठी http://from17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावीत, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विभागीय मंडळाकडे सादर करण्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने फॉर्म नं. 17 प्राप्त अर्जाची छाननी करुन जे उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांच्या भ्रमणध्वनीवर व ईमेलवर संदेश प्राप्त होतील अशा विद्यार्थ्यानी आपले स्वत:ची नाव नोंदणी प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन ऑनलाईन उपलब्ध करुन घ्यावीत.
इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन व येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी विभागीय मंडळामार्फत संपर्क केंद्रे निश्चित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना संपर्क केंद्रामार्फत स्वाध्याय पुस्तिका देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या स्वाध्याय पुस्तिका विशिष्ट कालावधीत वेळापत्रकाप्रमाणे सोडवून संपर्क केंद्राकडे जमा करावयाच्या आहेत. इयत्ता दहावीच्या संबंधीत विद्यार्थ्यांनी संपर्क केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा व तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment

नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम · पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन

  नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम ·          पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन   नांदेड ...