बालक, गरोदरमातांसाठी
लसीकरणाची विशेष मोहिम
नांदेड
, दि. 7 :- इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्यचा तिसरा टप्पा 7 ते 14 डिसेंबर 2017
या कालावधीमध्ये जिल्हयात राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांचे पालक, स्थानिक कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी,
खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, सामाजिक संस्था यांचा सहभाग घेऊन लसीकरणाची
मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले आहे. या
अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
उर्वरीत असंरक्षित लाभार्थ्यांना शंभर टक्के
लसीकरणाद्वारे संरक्षित करुन जिल्हयातील इंटेन्सिफाईड
मिशन इंद्रधनुष्य अभियान यशस्वी करण्याबाबत आरोग्य विभागातील सर्व
यंत्रणांना सुचना देण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरुन जिल्हास्तरीय अधिकारी,
पर्यवेक्षकीय अधिकारी कार्यक्षेत्रात देणार असून राज्य स्तरावरुन मोहिमेचे
संनियंत्रण करण्यात येत आहे.
यावेळी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्हि.आर.मेकाने, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री. शिंगाडे, शिक्षणाधिकारी श्री. खुडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, युनिसेफच्या
कल्सटंट डॉ. ज्योती पोतरे, म.न.पा.वैद्यकिय अधिकारी डॉ. बदरोद
/ दीन, जिल्हा निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. इंगळे आदी समिती
सदस्य बैठकीस उपस्थित होते.
ग्रामीण
, शहरी व मनपा क्षेत्रात निवडलेल्या कार्यक्षेत्रातील शुन्य ते
दोन वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. असंरक्षित
असलेल्या लाभार्थ्यांची संख्या कार्यक्षेत्रनिहाय जिल्हा स्तरावर प्राप्त झाली
त्यानुसार सर्व संस्थांना लसीचा साठा पुरविण्यात आला आहे. लसीकरणाची माहिती व
महत्व सांगण्यात येत असून वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना याबाबत सुचना
देण्यात आली आहे. शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर
माता यांना आजारापासुन संरक्षित करण्यासाठी विविध रोग प्रतिबंधात्मक लसी आरोग्य
विभागातर्फे दिल्या जातात. शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालके
व गरोदर माता या लसीकरणापासुन वंचित राहु नये यासाठी , केंद्र
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सन 2014 पासुन मिशन
इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम देशातील काही कमी काम असलेल्या
जिल्ह्यात प्रभावीपणे राबवुन डिसेंबर 2018 अखेर 90 टक्क्यापेक्षा जास्त बालके व गरोदर मातांना लसीकरणाद्वारे संरक्षीत
करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
नांदेड
जिल्हयातील निवडक शहरी व ग्रामीण भागात तसेच महानगरपालिका क्षेत्रातील काही भाग
यामध्ये समाविष्ट असून, लसीकरणापासुन वंचित बालकांना व मातांना
संरक्षित करण्यासाठी ही मोहिम ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मध्ये दि. 7 ते 14 व जानेवारी
2018 मध्ये दि. 8 ते 15 रोजी या मोहिमेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुढील निकषानुसार
कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे.
लसीकरणाचे
काम कमी असणारे कार्यक्षेत्र, जोखीमग्रस्त भाग ( घटसर्प,गोवर,धनुर्वात इ.रोगांचा उद्रेक झालेला भाग ,अतिदुर्गम
/डोंगराळ भाग,सलग तीन लसीकरण सत्रे रद्द झालेली गावे / विभाग, एएनएमची पदे
रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी
(स्लम एरिया), पल्स पोलिओ कार्यक्रमात
आढळलेले जोखीमग्रस्त भाग/कार्यक्षेत्र, विट्टभट्या/बांधकामे,स्थलांतरित/भटके रहिवासी यांच्या वस्त्या, उसतोड
कामगार वस्त्या, ईतर (पेरि अर्बन एरिया) मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना इंजेक्शन बिसीजी, आयपीव्ही, पेंटाव्हॅलेंट ,डिपीटी,
ओरल पोलिओ व्हॅक्सिन, “ अ ” जिवनसत्वाची मात्रा तसेच
गरोदर मातांना धनुर्वात प्रतिबंधक लस व लोहयुक्त गोळ्या द्यावयाच्या आहेत. या
मोहिमेत 0 ते 2 वर्ष या
वयोगटातील बालकांना क्षयरोग, पोलिओ, घटसर्प,
डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदुज्वर, काविळ, गोवर या
आजारासाठी रोगप्रतिबंधात्मक लसी या
मोहिमेंतर्गत द्यावयाच्या आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी व
पर्यवेक्षणासाठी राज्य स्तरावरुन पर्यवेक्षकीय व मुल्यमापन अधिकारी भेट देवुन
पाहणी करणार आहेत.
ही
मेाहिम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात गावपातळी ते महानगरपालिका
कार्यक्षेत्रापर्यंत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी (स्त्री / पुरुष)
लिंक वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जावून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन
असंरक्षित गरोदर माता व बालके यांच्या याद्या प्रत्येक महिन्यात तयार करण्यात येत
आहेत. 7 ते 14 आक्टोबर या कालावधीत ग्रामीण
शहरी व मनपा क्षेत्रात एकुण 206 लसीकरण सत्रामध्ये कार्य
झाले आहे. मागील आयोजित दोन फेऱ्यामधील
कार्याची तुलना करता जिल्हयामध्ये इंटेन्सिफाईड
मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना करण्यात आलेल्या लसीकरणात
सातत्याने सुधारणा होत असुन, ग्रामीण व शहरी भागामध्ये 90 टक्के कार्य झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली
आहे.
00000
No comments:
Post a Comment