वृत्त क्रमांक
बारावी व दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घोषित
नांदेड दि. 19 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) व इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक व संबंधित शाळा-महाविद्यालयांनी परीक्षेच्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार परीक्षांचे लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
इयत्ता बारावी परीक्षा
लेखी परीक्षा : सोमवार 8 फेब्रुवारी ते गुरूवार 18 मार्च 2027.
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन : बुधवार 20 जानेवारी ते शनिवार 6 फेब्रुवारी 2027.
इयत्ता दहावी परीक्षा
लेखी परीक्षा : सोमवार 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027.
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन : गुरूवार 28 जानेवारी ते शनिवार 13 फेब्रुवारी 2027.
परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणार वेळापत्रक हे अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ दिपक माळी यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment