Thursday, November 19, 2026

वृत्त क्रमांक

शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवादातून ‘खेत बचाओ अभियानाचा’ संदेश; मृदासंवर्धन आणि संतुलित खत वापरावर भर

नांदेड,दि. 20: जमिनीचे आरोग्य जपणे, मृदासंवर्धन करणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे आणि सेंद्रिय निविष्ठांचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘खेत बचाओ अभियानांतर्गत’ उमरी तालुक्यातील मियादादपूर येथे शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी (नांदेड-II) व आत्मा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभुरे, डॉ. निहाल मुल्ला तसेच कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी उमरी, शिवाजी मिरासे आणि आत्माचे लक्ष्मण जालावार यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी शास्त्रज्ञांनी मृदा आरोग्याचे महत्त्व, माती परीक्षणानुसार खतांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर, पीक अवशेष व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

कृषि विभाग व आत्माच्या प्रतिनिधींनीही शासकीय योजनांची माहिती आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीतील विविध समस्यांवर शास्त्रज्ञांशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले.

या उपक्रमातून मृदा संवर्धन, संतुलित खत व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

 ***




No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत  २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ;  सुधारित वेळापत्रकानुसार ...