Thursday, November 19, 2026

वृत्त क्रमांक

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 19 नोव्हेंबर :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे राहील. 

शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7 वा. अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 8.30 वा. गुरुगोविंदसिंग विमानतळ येथे आगमन व महाराष्ट्र राज्याच्या मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचे स्वागतासाठी उपस्थिती. सकाळी 8.50 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 8.55 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत दुष्काळी परीस्थितीबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.20 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत मोहनराव हंबर्डे माजी आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट. सकाळी 10.30 वा. नांदेड येथून कंधारकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.15 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कंधार. सकाळी 11.35 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत शांतीदूत स्व. गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.50 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत उपविभागीय अधिकारी कार्यालय नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. 

दुपारी 1 वा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे समवेत श्री शिवाजी हायस्कूल मैदान येथील जाहीर सभेस उपस्थिती. दुपारी 2 वा. कंधार येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण.  दुपारी 2.45 वा. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट स्थळ- साईसुभाष वसंतनगर नांदेड. दुपारी 3.50 वा. गुरुगोविंदसिंग विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. साय. 4.15 वा. नांदेड येथून लोहामार्गे शिरूर ताजबंद ता. अहमदपूरकडे मोटारीने प्रयाण करतील.

0000



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन नांदेड, दि. २० (जिमाका)- राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवा...