वृत्त क्रमांक
अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 19 :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 21 व 22 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 21 नोव्हेंबर 2026 रोजी नाशिक येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 8 वा. किनवट रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह किनवटकडे प्रयाण.
सकाळी 8.15 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे आगमन व राखीव. सकाळी 9.45 वा. किनवट येथून शासकीय वाहनाने किनवट तालुक्यातील जलधाराकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. जलधारा येथे आगमन व जननायक धरती आबा बिरसामुंडा यांच्या जयंती निमित्त जनसंवाद मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. हिमायतनगर तालुक्यातील वाळेकवाडीकडे शासकीय वाहनाने प्रयाण. दुपारी 2 वा. वाळकेवाडी येथे क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभास उपस्थिती. दुपारी 3 वा. वाळकेवाडी येथून शासकीय वाहनाने भोकर तालुक्यातील वाफी देऊळगावकडे प्रयाण. दुपारी 4 वा. वाफी देऊळगाव येथे आगमन व क्रांतीवीर तंट्या मामा भिल्ल यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरन समारंभास उपस्थिती. सायं. 5 वा. मोजे वाफी देऊळगाव येथून शासकीय वाहनाने भोकर तालुक्यातील वागदकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. वागद येथे आगमन व गावास भेट आणि चर्चा. रात्री 7 वा. वागद येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.
रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी सायं. 5 वा. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.50 वा. नांदेड येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

No comments:
Post a Comment