वृत्त क्रमांक
मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR )
राष्ट्रीय कार्यात रायवाडी गावाची आघाडी
नांदेड दि. 6 जुलै :- मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) चे राष्ट्रीय काम जलदगतीने व्हावे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांना मदत व्हावी आणि जि.प. रायवाडीची शाळा व्यवस्थित चालावी म्हणून गावचे पोलीस पाटील वैजनाथ पांचाळ यांच्या संकल्पनेतून रायवाडी ता. लोहा येथे यशस्वी उपक्रम राबवण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी घेतली रायवाडीच्या कामाची दखल
मौ.रायवाडी ता लोहा येथे 3 जुलै रोजी विशेष कॅम्प आयोजित करून मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कामाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सबंधीत सर्व यंत्रणेचे कौतुक केले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) शाळा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती यांना आवाहान केले आहे कि, रायवाडी गावाप्रमाणे शाळा सुरू होण्यापुर्वी सर्व मतदारांनी बिएलओ यांचे कडुन गणना फॉर्म घेवून शाळा सुटल्यानंतर गणना फॉर्म भरून परत करावे. अशा प्रकारे शाळाच्या कामकाजात व्यत्यय येणार नाही व मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे काम ही सुरळीत होईल.
दिनांक 2 जुलै रोजी गावात दवंडी देवून ग्रा.प. कार्यालयात तहसीलदार लोहा यांच्या उपस्थितीत नोंदणी कॅम्प घेण्यात येत असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार हनुमान मंदिर, मज्जीद आणि शाळेच्या ध्वनीक्षेपकावरून प्रसिध्दी देण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून शिक्षकांनी नागरिकांना राष्ट्रीय कार्यात त्वरित सहभागी होण्याचे आवाहन केले.
3 जुलै रोजी ग्रा.प. कार्यालय रायवाडी येथे मतदार यादीतील मतदारांच्या ओळखी करून सकाळी 06.30 वाजता त्यांना गणना प्रपत्र देण्यात आले. त्यांना वैयक्तीक माहिती भरण्यास बिएलओ यांनी मार्गदर्शन केले. तसेच सायंकाळी मौ. रायवाडी येथे दोन मतदान केंद्र असून एकूण -1433 मतदार आहेत. 900 मतदारांना गणना प्रपत्र वाटप करून प्रपत्र सायंकाळी 4 (चार) वाजता परत घेण्यात आले. सदरील कामास सर्व राजकीय पक्ष, गावकरी यांचे सहकार्य लाभले.
या कार्याची दखल घेऊन तहसीलदार लोहा विठ्ठल परळीकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) व्यवहारे यांनी "टीम रायवाडीचे" अभिनंदन केले. शिल्लक मतदारांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे अवाहन केले.
0000
No comments:
Post a Comment