वृत्त क्रमांक
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे देगलूर येथे आयोजन
नांदेड दि. 6 जुलै :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व अक्का महादेवी शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 8 जुलै 2026 रोजी अक्का महादेवी शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापना, हॉस्पिटल मध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 8 जुलै रोजी सकाळी 11 वा. पासून अक्का महादेवी शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगररोड बाबानगर नांदेड संपर्क ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक संर्पक क्र. 02462-251674 येथे संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment