Tuesday, July 28, 2026

 

📍नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत १६३ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत मार्गावरील विद्यमान इलेक्ट्रीक ट्रॅक्शन (विद्युत पुरवठा) प्रणालीचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत १६४ रेल ट्रॅकवर सध्या कार्यरत १x२५ केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली बदलून अत्याधुनिक आणि अधिक क्षमतेची २x२५ केव्ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामुळे रेलगाड्यांना अधिक स्थिर आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध होईल, तसेच रेल वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होईल.
हा मार्ग हा भारतीय रेल्वेच्या 'हायली युटिलाइज्ड नेटवर्क' (एचयूएन रूट-९) मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. हा मार्ग अजमेर, इंदूर, खांडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद, मेहबूबनगर आणि धोन या प्रमुख शहरांना आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरील क्षमतावाढीचा थेट लाभ प्रवासी वाहतूक, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही होणार आहे.
या आधुनिकीकरणामुळे भारतीय रेल्वेने २०२९-३० पर्यंत ३,००० दशलक्ष टन मालवाहतुकीचे निर्धारित केलेले उद्दिष्ट गाठण्यास मोठी मदत होणार आहे.




No comments:

Post a Comment

  नवी दिल्ली भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घे...