Tuesday, July 21, 2026

वृत्त क्रमांक 

शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात

प्रवेशासाठी 10 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 21 जुलै :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी पुनर/नुतन प्रवेशासाठी द्वितीय फेरीसाठी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.  

विहित कालावधीत परिपूर्ण पुर्न-प्रवेश/नुतन प्रवेशाचे अर्ज हे संबंधित विहित कागदपत्रासह स्विकारण्यात येईल. पुर्न-प्रवेश/नुतन प्रवेशाचे अर्ज कार्यालयात कार्यालयीन वेळेत 1 ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील.

माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी साठी शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

0000

No comments:

Post a Comment

  शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत नव्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्ती...