Tuesday, July 21, 2026

 वृत्त क्रमांक 

22 ते 28 जुलै दरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात महाआरोग्य शिबिर 

रक्तदानासह विविध मोफत आरोग्य तपासणी ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 21 जुलै :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त राज्यव्यापी रक्तदान व महाआरोग्य शिबिर अभियान 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत  आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मुंबईचे आयुक्त व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी ) येथे पुढील प्रमाणे विविध आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.

 

रक्तदान शिबिर 22 ते 28 जुलै कालावधीत रक्तपेढी (Blood Bank) येथे तर स्तन कर्करोग तपासणी शिबिर 22 ते 24 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-123 येथे, गर्भाशयमुख (Cervical) कर्करोग तपासणी शिबिर 25 ते 27 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-118. बोन मिनरल डेन्सिटी (BMD) व हाडांची तपासणी शिबिर 22 ते 24 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-115. नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 22 ते 24 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-121 येथे आयोजित करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध आरोग्यसेवा व तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत नव्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्ती...