Tuesday, February 17, 2026

वृत्त क्रमांक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न  

 शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्डे संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रमाचे दर्जेदार  सादरीकरण

अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवरांसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक केतन पुरी यांच्या व्याख्यानाने करण्यात आली. त्यांनी शिवचरित्राचा ऐतिहासिक संदर्भ देत महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य, संघटनशक्ती आणि राष्ट्रनिर्मितीतील मोलाचे योगदान यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.

यानंतर शाहिर प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यात शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमानाचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमास नांदेडच्या महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार-कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावी दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

0000


























No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;  महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री...